भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचा १०९ मतांनी विजय - BJP' Vasant Khandelwal new MLC Akola member by result of MLC Akola election 2021
अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानीक प्राधिकारी विधान परिषद मतदार संघ निवडणूक २०२१
भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचा १०९ मतांनी विजय
अकोला दि.१४ - अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानीक प्राधिकारी विधान परिषद मतदार संघातून (Akola-Washim-Buldhana MLC Election 2021) भाजपाचे वसंत खंडेलवाल (BJP Candidate Vasant Khadelwal) यांनी सतत तिन वेळेस विजयी झालेल्या शिवसेना उमेदवार गोपीकिसन बाजोरिया (Shivsena Candidate Gopikisan Bajoriya) यांचा तब्बल 109 मतांनी पराभव करीत राजकीय धुरिणींचा अंदाज फोल ठरविला.
अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानीक प्राधिकारी विधान परिषद मतदार संघ 2021 साठीची मतमोजणी या निवडणूकीत भाजपाचे खंडेलवाल यांना 443 मते प्राप्त झाली तर महाआघाडीचे उमेदवार गोपीकिसन बाजोरिया यांना 334 मते प्राप्त झालीत. विशेष म्हणजे या निवडणूकीत महाआघाडीची 150 चे वर मते भाजपाचे उमेदवाराला प्राप्त झालीत. निवडणुकीत 822 पैकी 808 मतदारांनी मतदान केले होते. यातील तब्बल 31 मते अवैध ठरली.
या मतदार संघातुन गतनिवडणुकी पर्यंत भाजप व सेना हे युती म्हणून एकत्रीत होते. या युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे गोपीकिसन बाजोरिया यांनी सलग तीन वेळा विजयश्री प्राप्त केला होता. मात्र यावेळेस शिवसेना हा महाआघाडीचा मुख्य पक्ष बनला आहे आणि ही निवडणूक शिवसेना-कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस ह्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत झाली.
Post a Comment