Header Ads

न्यायापासून कोणीही वंचित राहू नये - न्या. रोहित देव - No one should be deprived of justice - Justice. Rohit Dev



न्यायापासून कोणीही वंचित राहू नये - न्या. रोहित देव

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. रोहित देव यांचे रिठद येथे कायदेविषयक सेवा शिबिरात मार्गदर्शन 

वाशिम दि. 13 (जिमाका) - न्याय हा सर्वांसाठी समान आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करताना न्यायापासून कोणीही वंचित राहू नये. असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. रोहित देव यांनी केले.

    12 नोव्हेंबर रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त रिसोड तालुक्यातील रिठद येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कायदेविषयक सेवा शिबिरात मुख्य अतिथी म्हणून न्या.देव बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या,. संजय शिंदे, रिसोडचे दिवाणी न्यायाधीश श्री.कोईनकर, तहसीलदार,तालुका विधीज्ञ संघाचे अध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

   न्या. देव यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींची प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्यांची माहिती जाणून घेतली. शासनाच्या विविध योजनांची माहिती लावण्यात आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून माहिती घ्यावी. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

        न्या. श्रीमती सावंत म्हणाल्या, आजादी का अमृत महोत्सव हे अभियान संपल्यानंतर देखील समाजातील गरजू लोकांना विधी सहाय्य निरंतरपणे देण्यात येईल.असे सांगितले.

     यावेळी शासनाच्या विविध विभागामार्फत योजनांची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन न्या.देव यांनी केले. तहसील कार्यालय, कृषी विभाग, समाज कल्याण,आरोग्य, महिला व बाल विकास विभाग, पंचायत समिती, स्वच्छ भारत अभियान, टपाल कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिला बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे व इतर स्टॉल लावण्यात आले होते. 

       कार्यक्रमाला रिसोड तालुका विधीज्ञ संघाचे पदाधिकारी तसेच विधीज्ञ मंडळी, तालुक्यातील अनेक गावातील नागरिक, महिला, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रिठदचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन न्या.डॉ.श्रीमती आर.आर. तेहरा यांनी केले. आभार न्या. श्री.कोईनकर यांनी मानले.

         अशाच प्रकारे मालेगाव आणि मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथे कायदेविषयक सेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले. तालुक्यातील नागरिकांनी लावण्यात आलेल्या स्टॉलवरून योजनांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका विधीज्ञ संघाचे पदाधिकारी, विधिज्ञ मंडळी, तालुक्यातील नागरिक, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा कार्यकर्ती तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.