Header Ads

खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले - Khelo India Kabaddi : Selection of players and coach application invited



खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले

Khelo India Kabaddi : Selection of players and coach application invited

वाशिम, दि. 18 (www.jantaparishad.com) : वाशिम येथे खेलो इंडियाचे प्रशिक्षण शिबीर मंजूर करण्यात आले आहे. या शिबीराकरीता 15 मुले आणि 15 मुली अशा 30 खेळाडूंची निवड करण्याची कार्यवाही तसेच खेलो इंडिया कबड्डी (Khelo India Kabaddi) सेंटरकरीता प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीकोनातून अर्ज मागविले आहे. Selection of players and coach application invited

कबड्डी खेळाडू निवडीकरीता ज्या खेळाडूंनी SAI@https://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर आयटी प्राप्त केलेले खेळाडू व जे खेळाडू खेलो इंडियाच्या निकषानुसार पात्र ठरतील अशा खेळाडूंची निवड खेलो इंडिया सेंटरमध्ये निवड करण्यात येईल. तसेच ज्या खेळाडूंनी अद्यापही वरील दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली नाही. त्यांनी या संकेतस्थळावर आपली नोंदणी केलेल्या खेळाडूंना खेलो इंडियाच्या सेंटरमध्ये निकषानुसार 28 नोव्हेंबर रोजी निवडीकरीता चाचणी देता येईल.

खेलो इंडिया सेंटर कबड्डी प्रशिक्षण निवडीकरीता 18 ते 45 वयोगट यामध्ये अतिउच्च कामगिरी/ गुणवत्ता असल्या समितीच्या मान्यतेने 50 वर्षाच्या उमेदवारांना संधी देण्यात यावी. ज्यांनी आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाकडून पदक प्राप्त किंवा प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये पदक विजता किंवा खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेमध्ये पदक विजेते, एन.आय.एस. पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेवल कोर्सेस किंवा बी.पी.एड,/ एम.पी.एड./ पदवी/ पदव्युत्तर पदवी प्राप्त किंवा नॅशनल गेम्स पदक पात्र प्रशिक्षकाच्या अनुभवासह इत्यादी प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे 24 नोव्हेंबरपर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज सादर करावेत. किंवा dso.washim@rediffmail.com या ई-मेल आयडीवर सायंकाळी 5 वाजतापर्यंत अर्जदाराने संबंधित कागदपत्रासह पाठवावे. त्यावर नांव, खेळ, प्रशिक्षकाचा अनुभव, खेळाचा स्तर इत्यादीचे स्वयंस्पष्ट कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. असे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.