Header Ads

वाशिम जिल्ह्यातील एकूण ८३ बुथ संवेदनशील - zp election 83 sensitive booths in washim district



जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुक-2021

वाशिम जिल्हा पोलिस दलाद्वारे कायदा व सुव्यवस्थेसाठी विविध उपाययोजना

जिल्ह्यातील एकूण ८३ बुथ संवेदनशील

वाशिम दि. ०४ - जिल्हयात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक मतदान दि.05.10.2021 रोजी असुन दिनांक 06.10.2021 रोजी जिल्हयात 06 ठिकाणी मतमोजनी करण्यात येणार आहे. जिल्हयात एकुण जिल्हा परिषद गट संख्या-14 व पंचायत समिती गण संख्या -27 आहेत.जिल्हयात निवडणुक होत असलेल्या गावांची एकुण संख्या 410 असुन 292 ईमारतीत 559 बुथवर मतदान होत आहे.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँगरूम असुन मतमोजनीचे अनुषंगाने सुध्दा बंदोबस्त आराखडा तयार करण्यात आला आहे. मागील 05 वर्षाचे निवडणुक काळात घडलेले दखलपात्र तसेच अदखलपात्र गुन्हयातील आरोपीवर प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हयात एकुण 83 बुथ संवेदनशील निश्चीत करण्यात आलेले असुन त्या ठिकाणी वाढीव बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. 

निवडणुकीचे काळात कायदा व सुव्यवस्था परिस्थीती आणि जातीय सलोखा कायम रहावा आणि निवडणुक प्रक्रीया भयमुक्त वातावरणात पार पडावी या दृष्टीने बुथ बंदोबस्त, सेक्टर पेट्रोलींग, स्थीर सर्वेलस पथक,फ्लाईंग स्क्वॉड,व्हिडीओ चित्रिकरण पथक, पोस्टे रिझर्व मनुष्यबळ स्ट्रायकींग फोर्स,नियंत्रण कक्ष वाशिम येथील राखीव मनुष्यबळ, असे आवश्यकतेनुसार आराखडा बनवुन एकुण पोउपअधिक्षक-06, पोलीस निरीक्षक-15 सपोनि/पोउपनि-76, पोलीस अंमलदार -938, होमगार्ड -600, SRPF ची 01 कंपनी असे तैनात करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन जिल्हयात कलम 107,116 (3) फोप्रसं नुसार 215, कलम 110 फौप्रसं नुसार15 कारवाया करण्यात आलेल्या असुन अवैध धंद्याविरूध्द दारूबंदी कायद्यानुसार एकुण 61 केसेस करून 584630/- रू चा माल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा नुसार 33 केसेस करून 85105/- रू चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

जिल्हयातील 12 शस्त्र परवानाधारकांची अग्नीशस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तसेच 24 ठिकाणी दंगा काबु योजनेची रंगीत तालीम व 33 ठिकाणी प्रभावीपणे पोलीस पथसंचलन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दि. 03.10.2021 रोजी मा.पोलीस अधिक्षक स्वतः आणि अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे एकुण 250 जनांनी सहभाग घेऊन वाशिम शहरामध्ये पथसंचलन केले आहे. जिल्हयात सर्व पोस्टे च्या ठिकाणी 'कोबिंग ऑपरेशन' राबवुन शरीरा विरूध्दचे गुन्हयातील आरोपी, मालमत्ता गुन्हयातील आरोपी, आर्मॲक्ट गुन्हयातील आरोपी, सराईत गुन्हेगार, निगराणी बदमाश, पॅरोलवरील कैदी, अशा गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हयातील जामीनपात्र वारंट, अजामीनपात्र वारंट ची बजावणी प्रभावीपणे करण्यात आली आहे.

पोलीस व जनता यांचेतील जनसंपर्क व समन्वय या दृष्टीकोनातुन जिहयातील वरिष्ठ अधिकारी व ठाणेदार यांनी महत्वाचे ठिकाणी भेटी दिलेल्या असुन शांतता समितीच्या बैठका, मोहल्ला समिती बैठका, पोलीस मित्र बैठका घेण्यात आलेल्या असुन मा.पोलीस अधिक्षक यांनी वाशिम, रिसोड, कारंजा येथे बैठका घेतलेल्या आहेत.

मा.पोलीस अधिक्षक संपुर्ण निवडणुक प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असुन निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल आहोत. निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हयातील सर्व नागरीकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व काही आक्षेपार्ह घटनेची माहीती प्राप्त झाल्यास नियंत्रण कक्ष वाशिम येथे कळवावी. कोविड-19 संदर्भातील शासनाचे निर्देशाचे पालन होईल या दृष्टीने पोलीस प्रशासनाने संपुर्ण खबरदारी घेतली असुन विजयी उमेदवारांना शासनाच्या निर्देशानुसार विजयी मिरवणुका काढण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेले आहेत. तसेच जनतेने सुध्दा कोविड-19 च्या नियमाचे तसेच आदर्श आचार संहितेचे पालन करावे. याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.