WASHIM JOB FAIR 1 - ७४ जागेसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा - ३१ ऑक्टोबरपर्यंत सहभाग नोंदवावा
WASHIM-JOB FAIR-1
74 जागेसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा
31 ऑक्टोबरपर्यंत सहभाग नोंदवावा
वाशिम, दि. 29 (जिमाका) : कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव कमी होत असल्याने विविध नियोक्त्यांकडे नव्याने मनुष्यबळ घेण्यात येत आहे. काही नियोक्त्यांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाने ऑनलाईन पध्दतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 27 ते 31 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित केला आहे. या मेळाव्यात वाशिम जिल्ह्यातील व राज्यातील नामांकित आस्थापना कंपन्यांमध्ये 74 रिक्त जागेवर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने संबंधीत कंपनीकडून मनुष्यबळ मागणी करण्यात आली आहे. (WASHIM JOB FAIR 1)
जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय (सर्व ट्रेड) उत्तीर्ण मॅकेनिक पदविका, सर्वशाखीय पदवीधर आणि संगणक ज्ञान असणाऱ्या रोजगार इच्छुक पुरुष/स्त्री उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड) च्या युझरनेम व पासवर्ड मधून मेळाव्यात सहभागी होता येईल. त्यानुसार सहभागी उद्योजक ऑनलाईन सहभागी झालेल्या उमेदवारांच्या पंसतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ उद्योजकांकडून एस.एम.एस., दुरवध्वनी, ई-मंल,किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखती घेवून नोकरी/ रोजगारांची संधी देण्यात येणार आहे.
तरी वाशिम जिल्ह्यातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी सुध्दा या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने 31 ऑक्टोबरपर्यत आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी पुढील पध्दतीने सहभागी व्हावे. उमेदवाराकडे एम्प्लॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावा. नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड उपलब्ध करुन घ्यावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बालुकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर Click करावे. येथे उमेदवारास वाशिम जिल्हा निवडणून त्यातील WASHIM JOB FAIR 1, (27 ते 31 ऑक्टोबर 2021) मध्ये नमुद पात्रतेनुसारच्याय पदांवर अप्लाय करावे. त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल. या पध्दतीने उमेदवार रोजगार मेळाव्यात सहभागी झालेला असेल. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 07252-231494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Post a Comment