Header Ads

स्टेट बँक ऑफ इंडियात 7425 सुरक्षा रक्षक पदासाठी माजी सैनिकांची पदभरती - Recruitment of 7425 Security guard ex-servicemen in State Bank of India



स्टेट बँक ऑफ इंडियात 7425 माजी सैनिकांची पदभरती

Recruitment of 7425 ex-servicemen in State Bank of India

वाशिम, दि. 29  (जिमाका) :  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7425 सुरक्षा रक्षक नियुक्त (Recruitment of 7425 ex-servicemen in State Bank of India) करण्यात येणार आहे. या पदासाठी सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जे माजी सैनिक इच्छुक आहेत त्यांनी 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, पी.पी.ओ व एम्प्लॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट देवून आपले नावे नोंदवावे.

सुरक्षा रक्षक या पदाकरीता पात्रता पुढीलप्रमाणे असावी. उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2021 रोजी 45 वर्षापेक्षा कमी नसावे. शिक्षण इयत्ता 8 वी पास पण 12 वी पास नसावा. सैन्य दलात कमीत कमी 15 वर्ष सेवा झालेली असावी. सैन्य दलातील हुद्दा हा जास्तीत जास्त Hav and below  असावा. सैन्य दलातील चारित्र्य चांगले असावे. मेडीकल कॅटेगरी AYE/SHAPE-I असावी. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे. Recruitment of 7425 ex-servicemen in State Bank of India

No comments

Powered by Blogger.