कामगार विभाग - मसुद्याच्या हरकती नोंदवा - Department of Labor - Report Draft Objections
कामगार विभाग - मसुद्याच्या हरकती नोंदवा
कामगार विभागाचे आवाहन
वाशिम दि.०५ (जिमाका) : केंद्र शासनाचे सामाजिक सुरक्षा संहिता २०२० मध्ये प्रसूती लाभ अधिनियम, उपदान प्रदान अधिनियम आणि असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियमांचे एकत्रीकरण केले आहे. याबाबत महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम २०२१ तयार करण्यासाठीचा मसुदा तसेच महाराष्ट्र वेतन संहिता नियम २०२१ तयार करण्यासाठीचा मसुदा देखील राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर मसुदे कामगार विभागाच्या महा कामगार या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या मसुद्याबाबत काही अभिप्राय, सूचना हरकती, आक्षेप असतील तर सर्व कामगार, मालक व त्यांच्या सर्व संघटनांनी तसेच सर्व संबंधितांनी ४५ दिवसांच्या आत कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे पाठवावेत किंवा mahalabourcommr@gmail.com या ई-मेलवर सादर करावे. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी जी.आर. नालिंदे यांनी केले आहे.
Post a Comment