मोटार वाहन निरीक्षकांच्या कारंजा व रिसोड शिबीर दौरा तारखेत बदल - change in dates of rto for karanja and risod
मोटार वाहन निरीक्षकांच्या कारंजा व रिसोड शिबीर दौरा तारखेत बदल
वाशिम, दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यातील मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात येते. त्यानुसार 3 नोव्हेंबर रोजी कारंजा येथे व 8 नोव्हेंबर रोजी रिसोड येथे मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार होते.
मात्र, तांत्रिक अडचणीमुळे यामध्ये अंश:ता बदल करुन ३ नोव्हेंबर ऐवजी आता 2 नोव्हेंबर रोजी कारंजा व 8 नोव्हेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला रिसोड येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.
Post a Comment