वाशिम जिल्हयात 27 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - DM Order Prohibition order in washim district till 27 october
वाशिम जिल्हयात 27 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, दि. 14 (जिमाका) : जिल्हयात स्थापन करण्यात आलेल्या नवदुर्गा मुर्तीचे 16 व 17 ऑक्टोबर रोजी विसर्जन होणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण आहे. सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव कायम असल्याने प्रतिबंधात्मक निर्देशाचे पालन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. नौकरीमध्ये पदोन्नतीस मागासवर्गीयांना 33 टक्के आरक्षण ठेवावे, या मागणीसाठी विविध कर्मचारी संघटनांकडून विविध प्रकारचे आंदोलने करण्यात येत आहे. केद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक, शेतकरी कर्जमाफी, पीककर्ज मंजूरी, दुध दरवाढ, वाढती महागाई, वीज बील माफी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्यासंदर्भात विरोधी पक्षाच्यावतीने तसेच शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रम केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा जातीयदृष्टया आणि सण उत्सवाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. मागील काही काळात घडलेल्या जातीय घटनांच्या प्रतिक्रीया आगामी सण उत्सवाच्या काळात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी मुंबई पोलीस अधिनियम कलम 1951 चे कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश 27 ऑक्टोबरपर्यंत लागू केले आहे.
शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तिक्षण वस्तू जवळ बाळगणे, दहाक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे जवळ बाळगणे यास मनाई करण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तीच्या जमावास एकत्र येण्यास किंवा मिरवणूकीस मनाई करण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या बाबींचे पालन करुन कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, इतर शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेष रित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास हे आदेश लागू राहणार नाही.
Post a Comment