कोविड-19 आजाराने मृत्यु पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान - Sanugrah grant of Rs. 50,000 to the heirs of those who died of Covid-19 disease
कोविड-19 आजाराने मृत्यु पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान
वाशिम दि. २१ (जिमाका) : कोविड-19 या आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार एवढे सानुग्रह अनुदान देण्याबाबत सर्वोच्च न्ययालयाने आदेश दिले असून, त्याच अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार ही मदत मिळणार आहे. 50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, वाशिम, जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), दुसरा मजला, वाशिम-444505 संपर्क क्रमांक 07252-234238, 8379929414 आणि ई-मेल आयडी rdcwashim@gmail.com असा आहे.
जिल्हाधिकारी, वाशिम हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहे. मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती लवकरच अधिसुचित करण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.
Post a Comment