Header Ads

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय - temples to be opened from navratri



नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे

मुंबई 24 - नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. 

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे.

धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.