Header Ads

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन pm kusum b yojana solar agro pump



प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ (Maha krishi Urja Abhiyan) अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना (pm kusum b yojana) जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.