Header Ads

वाशिम दि 15-09-21 - जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू jamavbandi in washim district till 21 sept 2021



वाशिम जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू

वाशिम, दि. १५ (जिमाका) : कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात गणेशोत्सव काळात भाविकांनी, लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १४ सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जमावबंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचेवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.