Header Ads

माजी सैनिकांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती - Ex-servicemen's children will get scholarships



 माजी सैनिकांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती

१० ऑक्टोंबर २०२१ पर्यंत अर्ज सादर करावे

वाशिम (www.jantaparishad.com) दि. १७ : सन २०२० मध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदविका व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण प्राप्त करून पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. तरी ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता दहावी, बारावीमध्ये ६० टक्के गुण प्राप्त केले आहेत, त्यांनी १० ऑक्टोंबर २०२१ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वाशिम येथे कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. Ex-servicemen's children will get scholarships

इयत्ता दहावी, बारावी, पदविका व पदवी परिक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, केंद्र व राज्य शासनाची इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे. अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीची मंजूरी घ्यावी. माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची व रेशनकार्डची साक्षांकित प्रत, मुलीचे वय १८ वर्षे पेक्षा जास्त असल्यास ती अविवाहीत असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, अर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू), राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.