Header Ads

वाशिम दि.4/9/21- स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता जाणारे गोवंशाची केली सुटका LCB rescued govansh going for slaughter



स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता जाणारे गोवंशाची केली सुटका

 गोवंशासह १६,६५,००० / - रू मुददेमाल जप्त 

वाशिम (www.jantaparishad.com) दि ४/९/२१ - मा. पोलीस अधिक्षक श्री . वसंत परदेशी वाशिम यांच्या आदेशावरून जिल्हयात अवैद्य धंदयाविरूध्द कार्यवाही करीता धडक मोहिम सुरू असतांना पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ जाधव यांना प्राप्त माहितीवरून वाशिम जिल्हयात अवैद्य गोवंश ची कत्तलीकरीता वाहतुक होत आहे अशा खबर वरून अधिनस्थ स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील पोलीस अधिकारी व अमलदार यांना सदर खबर ची माहिती देवुन कार्यवाही करीता रवाना केले. 


प्राप्त माहिती वरून पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने सापळा रचुन एक सहा टायर टाटा कंपनीचा ट्रक क.एम.एच ४० बिएल १०७ ९ मध्ये अवैद्य रित्या कत्तलीकरीता गोवंशाची चोरटी वाहतुक करणा - या ट्रक ला नाकाबंदी करून थांबविले.  सदर ट्रक चालकास सदर ट्रकमध्ये कशा प्रकारची वाहतुक होत आहे या बाबत विचारणा केली असता सदर ट्रक चालक हा उडवा उडविची उत्तरे देत असल्याने सदर ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये १९ गोवंश जातीचे बैल कोंबुन वाहतुक करीत असतांना मिळुन आला. सदर चालकास गोवंशच्या मालकी व वाहतुक परवाना बाबत विचारणा केली असता त्याचे कडे कुठलेही कागदपत्रे मिळुन आले नाहीत त्या मुळे सदर ट्रकचालक नामे १ ) मो.साजीद मो.अश्पाक वय ३४ वर्ष , २ ) सै.शाहरूख सै.अहमेद वय २८ वर्ष दो.रा.आसेगांव यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन अनसिंग येथे अप.क. २६३/२१ कलम ११ ( १ ) ( D ) प्राणीसरक्षण अधिनियम सह कलम २३ ) १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून एकुण १६,६५,००० / - रू चे गोवंश व ट्रक जप्त करण्यात आला आहे. यातील गोवंश हे अनसिंग येथील ग्रामपंचायत कोंडवाडयाच्या ताब्यात देण्यात आले. 

सदर ची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.वसंत परदेशी साहेब व मा . अपर पोलीस अधिक्षक श्री . विजय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ जाधव यांच्या आदेशावरून सपोनि प्रमोद इंगळे , नापोका अमोल इंगोले , पोका अश्विन जाधव , प्रविण राउत , संतोष सेनकुड़े चापोका मिलींद गायकवाड यांनी केली .

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.