Header Ads

वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन काळाची गरज - नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे tree plantation in kinhi rokde



वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन काळाची गरज - नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे 

कारंजा दि. २३ -  तालुक्यातील ग्राम किन्ही रोकडे येथे आज दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी मनसे नेते अनुप ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्माण फाऊंडेशनचे संचालक नितीन तायडे होते. 



कोरोनाच्या काळात ऑक्सीजनची गरज भासू लागल्याने खऱ्या अर्थाने आपल्याला वृक्षांचे महत्व कळू लागले आहे. भविष्यात ऑक्सीजनची कमी पडू नये, तसेच पर्यावरणाचा  ऱ्हास होऊ नये. याकरिता प्रत्येक व्यक्तिने वृक्ष लागवड करुन वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अनुप ठाकरे यांनी व्यक्त केले.

वृक्षारोपण गावातील जि. प. मराठी शाळा, जि प उर्दू शाळा, ग्राम पंचायत, स्मशानभूमी व गावाचा मुख्य रस्त्यावर करण्यात आले.

यावेळी पुढे अनुप ठाकरे म्हणाले की, वृक्षारोपण दिनापासुन आत्तापर्यंत वृक्षारोपण सुरुच आहे. पण अनेक व्यक्ती वृक्षारोपण करुन त्याचे फोटो शेसन झाले की, त्या रोपटयाला वाढवून त्याच संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष करतात दरवर्षी एवढे वृक्षारोपण करुन त्यामधील काही झाडे टिकतात तर अनेक रोपटे देखरेखी अभावी सुकून जातात. मानवाला ऑक्सीजन, पाण्याची कमरतात भासु नये, प्रदुषणाचा ऱ्हास होवू नये, याकरिता सर्व सामाजिक संघटना, शासकिय स्तरावरील यंत्रणा व प्रत्येकांनी वृक्ष लागवड सोबतच वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे.

यावेळी आशाबाई रोकडे, कमलाबाई रोकडे,मिराबाई रोकडे, शांताबाई घोडके, मुनिफा बी, बेबीबाई कवळे, लक्ष्मीबाई चव्हाण, नर्मदाबाई कदम, ताराबाई रोकडे, विमलाबाई बाहे, मंदाबाई रोकडे, सुशिलाबाई रोकडे, कोकीळाबाई गिरी, प्रमोद रोकडे, श्रीकृष्ण रोकडे, गणेश साखरे, ओंकार रोकडे, गणेश चव्हाण, अंकुश अवघण, रवि रोकडे, वासुदेव रोकडे, सुरेश घोडके, गुलाब रोकडे तसेच ग्राम सचिव गावंडे साहेब, ग्राम तलाठी गुल्हाने साहेब, ग्राम कर्मचारी सचिन रोकडे, जि प शाळेचे शिक्षक सिरसाठ सर, जि प उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मो. फारुख आदीसह इतर महीला व गावकरी उपस्थित होते 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.