Header Ads

केंद्र शासनाने सोने दागिण्यांवर हॉलमार्क सोबत लागू केलेला HUID हा जाचक काळा कायदा रद्द करणेबाबत मागणी - karanja bullion market closed today against HUID

 


केंद्र शासनाने सोने दागिण्यांवर हॉलमार्क सोबत लागू केलेला HUID हा जाचक काळा कायदा रद्द करणेबाबत मागणी 

कारंजा सुवर्णकार व सराफा असोसिएशन चे  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

HUID विरोधात आज कारंजा सराफा बाजारपेठ बंद

कारंजा (www.jantaparishad.com) दि.२३ - केंद्र सरकारने जारी केलेला हॉलमार्क सह HUID हा कायदा जाचक असून काळा कायदा असल्याचे सांगून तो त्वरीत रदद करावा ही मागणी कारंजा सुवर्णकार व सराफा असोसिएशन (Karanja Suvarnkar Sarafa Association) ने जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडे आज एका पत्रकाद्वारे केली. असोसिएशनचे शिष्ट मंडळाने याबाबत कारंजाचे नायब तहसीलदार हरणे साहेब यांना हे निवेदन दिले. 

आज रोजी ठेवण्यात आली दुकाने बंद

केंद्र शासनाचे या कायद्याचे विरोधात संपूर्ण देशातच विरोध सुरु असून त्वरीत हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी सराफा व संबंधीत व्यवसायीक यांच्या वतीने केली जात आहे. यासाठी आज कारंजा येथे देखील असोसिएशन चे वतीने संपूर्ण सराफा बाजारपेठ सांकेतिक बंद करुन निषेध व्यक्त केला. 


केंद्राने लागू केलेले हॉलमार्क चे आम्ही स्वागत करतो, मात्र त्यासोबतच व्यवसाय करतांना अत्यंत जाचक होणार्‍या HUID चा सर्वांनी विरोध केला. हा कायदा आम्हाला अपराधींच्या कठड्यात उभा करणार असून या कायद्यात अनेक कष्टदायक नियमावली करण्यात आली आहे, असे मत कारंजा सुवर्णकार व सराफा असोसिएशनचे अध्यक्ष अकाश कर्र्‍हे यांनी व्यक्त केले. 

    अनेक पिढ्यांपासून सुवर्णकार व सराफा हे सोने दागिणांचा व्यवसाय इमाने इतबारे करीत आहेत. वेळोवेळी ग्राहकांच्या मदतीसाठी आलेले विविध कायद्यांचे स्वागत करण्यात आले आहे. शुद्धतेचे प्रमाण ग्राहकांना समजावे या उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेले हॉलमार्क चे ही आम्ही आनंदाने स्वागत करीत त्याचा स्विकार केला आहे. परंतू सर्व नाराजी ही HUID ह्या काळ्या कायद्याबाबत आहे. असे मत शिष्ट मंडळाने व्यक्त केले. 

    निवेदन देतांना असोसिएशन चे अध्यक्ष आकाश कर्र्‍हे,  उपाध्यक्ष मंगेश कड़ेल, सचिव सचिन वडालकर, गुळकरि,  गौरव नंदे, राजेंद्र अंगाईतकर, अनिल आसरे, सुनील बैतुले, नंदू आसरे, तात्या कुंभार, अक्षय चव्हाण, शशिकांत अंगाईतकर,  आरिफ झारेकर, राहुल पाटिल आणि सर्व व्यापारी उपस्थित होते.        

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.