Header Ads

कारंजा वन पर्यटन केंद्राचे "स्व.प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र, कारंजा" असे नामकरण - Swa. Prakash dada Dahake Nisarg Paryatan Kendra, Karanja


कारंजा वन पर्यटन केंद्राचे "स्व.प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र, कारंजा" असे नामकरण 

राज्य शासनाने एका आदेशान्वये केले जाहीर

कारंजा (जनता परिषद) दि.१८ - आज दि. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे वतीने एका आदेशान्वये एक विशेष बाब म्हणून कारंजा वन पर्यटन केंद्राचे स्व.प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र, कारंजा असे नामकरण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. 

कारंजा शहराच्या मध्यवर्ती भागात ९३ हेक्टर क्षेत्रावरील वनजमिनीवर कारंजा वनपर्यटन केंद्र विस्तारलेले आहे. कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्व.श्री.प्रकाशदादा डहाके यांनी हे वनपर्यटन केंद्र साकार व्हावे यासाठी खुप प्रयत्न केलेत. कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघामध्ये विकासाची अनेकानेक कामे केलीत. विशेषत: वन पर्यटन केंद्रासाठी त्यांनी दिलेले महत्वपूर्ण योगदान साठी स्थानीक नागरिकांनी या वन पर्यटन केंद्राला त्यांचे नाव देण्यात यावे ही मागणी शासनाकडे केली होती त्यानुसार हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. 

उद्या दिनांक १९ ऑगस्ट रोजी दादांचा वाढदिवस असतो, तो जयंती दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. जयंती दिवसाचे पुर्वसंध्येवर ह्या वन पर्यटन केंद्राला त्यांचे नाव देऊन सन्मान करीत त्यांचे प्रती खरी श्रद्धांजली देत कार्यकर्ते, स्थानीक नागरिक यांच्या या मागणीला शासनाने मान्य केले आहे.

No comments

Powered by Blogger.