Header Ads

‘शासन शब्दकोश भाग-१’ हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्लेवर उपलब्ध - (Shasan Shabdkosh Bhag 1 Governance Dictionary Part-1’ on Google Play store



‘शासन शब्दकोश भाग-१’ हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्लेवर उपलब्ध

मुंबई, दि. 18 : शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त  शब्द असलेले  ‘शासन शब्दकोश भाग-1’  (Shasan Shabdkosh Bhag 1 / ‘Governance Dictionary Part-1’) हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवर (Google Play store) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपयोजकाची लिंक (link) पुढीलप्रमाणे आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=gov.maharashtra.shabdkoshapp  हे उपयोजक भ्रमणध्वनी स्थापित (Download) करता येणार आहे. भाषा संचालनालयाने ‘शासन शब्दकोश भाग-1’ हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

शासन शब्दकोश भाग-1 या भ्रमणध्वनी उपयोजकामध्ये कार्यदर्शिका, शासन वाक्ययोग, शासन व्यवहार कोश आणि न्याय व्यवहार कोश असे एकूण चार कोश डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत.या चारही कोशांना इंग्रजी X मराठी तसेच मराठी X इंग्रजी या पद्धतीने पाहता येऊ शकते. हे भ्रमणध्वनी उपयोजक आंतरजालासह (With Internet) किंवा आंतरजालाशिवाय (Without Internet) वापरता येऊ शकते. या अनुषंगाने सविस्तर माहितीसाठी किंवा येणाऱ्या अन्य तांत्रिक अडचणींबाबत भाषा संचालक, भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051. दूरध्वनी क्र.022-26417265 येथे संपर्क साधावा.

याविषयीचे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.