Header Ads

28 Aug 2021 - वाशिम जिल्हा पोलिस अधिक्षक वसंतजी परदेशी यांचे आदेशानुसार ८ पोलिस निरिक्षकांच्या तात्पुरत्या तैनाती - PI appointments and transfer in washim district



वाशिम जिल्हा पोलिस अधिक्षक वसंतजी परदेशी यांचे आदेशानुसार ८ पोलिस निरिक्षकांच्या तात्पुरत्या तैनाती 

कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पदी मालेगांवचे पिआय आधारसिंग सोनोने तर मालेगांव येथे प्रविण धुमाळ यांची नियुक्ती

कारंजा (www.jantaparishad.com) दि.२८ - वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वसंतजी परदेशी यांनी काल दिनांक २७ ऑगस्ट रोजी एका आदेशानुसार जिल्हा पोलिस निरीक्षक यांच्या तात्पुरत्या तैनाती केल्या आहेत. ह्या नियुक्त्या ह्या प्रशासकीय कारण तसेच जिल्ह्यात नव्याने हजर झालेले पोलिस निरिक्षक यांच्या समावेशासाठी करण्यात आल्या आहेत. 

अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या कारंजा शहर पोलिस स्टेशन  ला ठाणेदार म्हणून मालेगांव येथे कार्यरत असलेले पोलिस निरिक्षक आधारसिंग सरदारसिंग सोनोने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मालेगांव पोलिस स्टेशनला जिल्ह्या विशेष शाखेचे प्रविण राजाराम धुमाळ यांची बदली करण्यात आली आहे. ह्या दोन्ही नियुक्त्या ह्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी पोलिस निरिक्षकांच्या झालेल्या विभागीय स्तरीय बदल्यांमुळे दुसर्‍या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात पोलिस नियंत्रण कक्षाला आलेल्या पोलिस निरिक्षकांनाही विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे,

1) पोलिस निरिक्षक सारंगधर वासुदेव नवलकार यांची टि.एम.सी.सेल वाशिम येथे नियुक्ती. 2) पोलिस निरिक्षक सुनिल दिवाणराव जाधव यांची पोलिस स्टेशन मानोरा येथे नियुक्ती. 3) पोलिस निरिक्षक सुनिल पांडुरंगपंत हुड यांची पोलिस कल्याण शाखा येथे नियुक्ती. 4) पोलिस निरिक्षक ब्रम्हदेव सखाराम शेळके यांची पोलिस नियंत्रण कक्षात नियुक्ती. 5) पोलिस निरिक्षक रफिक चांदसाहेब शेख यांची पोलिस स्टेशन सायबर वर नियुक्ती. तर 6) पोलिस निरिक्षक देवराव चिंतामण खंडेराव यांची जिल्हा विशेष शाखेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.