Header Ads

पात्र बालकांचे पीसीव्ही लसीकरण करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. - Vaccinate eligible children for PCV - Collector Shanmugarajan S.



पात्र बालकांचे पीसीव्ही लसीकरण करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

वाशिम (www.jantaparishad.com) दि. २८ - दोन वर्षाच्या आतील बालकांना (Infants under two years of ageस्ट्रेप्टोकोकस न्युमोनी बॅक्टेरियामुळे न्युमोनिया (Pneumonia caused by Streptococcus pneumoniae bacteria) हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे. न्युमोकोकल न्युमोनिया (Pneumococcal pneumonia) हा श्वसन मार्गाला होणारा आजार आहे. त्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. प्रसंगी मुले बेशुद्ध होवू शकतात व मृत्यू देखील होवू शकतो. हे गंभीर परिणाम लक्षात घेता जिल्ह्यातील पात्र बालकांचे पीसीव्ही लसीकरण (PCV vaccination) वेळेत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

२७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (Pneumococcal conjugate vaccine) अर्थात पीसीव्ही लसीच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा कृती दलाची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, कृती दलाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. गावंडे यांची उपस्थिती होती.

बालके ही देशाचे भविष्य असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, भावी पिढी ही सदृढ असली पाहिजे, याकरिता त्यांच्यासाठी असलेल्या सर्व प्रकारच्या लसी त्यांना वेळेत दिल्या पाहिजे. बालकांचे लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणेसोबतच आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका यांची महत्वाची भूमिका आहे. यावर्षीपासून पीसीव्ही लसीकरण मोफत करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र बालक पीसीव्ही लसीकरणापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

डॉ. आहेर म्हणाले, २ वर्षाच्या आतील बालक न्युमोनियामुळे आजारी पडतात. बालकांना न्युमोनिया होवू नये, प्रसंगी त्यांचे मृत्यू रोखण्यासाठी पीसीव्ही लस उपयुक्त आहे. पीसीव्ही लसीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ही लस तीन डोसमध्ये देण्यात येत आहे. पहिला डोस हा बालकाला वयाच्या ६ आठवड्यात, दुसरा डोस १४ आठवड्यात आणि तिसरा बुस्टर डोस वयाच्या ९ व्या महिन्यात किंवा जास्तीत जास्त वयाच्या पहिल्या वर्षी देता येतो. जिल्ह्याला पीसीव्हीचे १२०० डोस प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत ६ आठवड्याच्या अर्थात दीड महिन्याच्या ६०० बालकांना पहिला डोस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण मोहिमेमध्ये पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आल्याचे सांगून डॉ. आहेर म्हणाले, या लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणेचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये पीसीव्ही लसीची किंमत ५ हजार रुपये आहे. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत ही लस बालकांना मोफत देण्यात येत आहे. बालकांना ही लस दिल्यास बालक न्युमोनिया आजारापासून मुक्त राहील. बालकांना या लसीमुळे कोणतीही रिअॅक्शन येत नसल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.