Header Ads

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केला सिआरपीएफ जवान निशांत काकडेंचा सत्कार - CRPF jawan Nishant Kakade felicitated by DM and SP

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केला सिआरपीएफ जवान निशांत काकडेंचा सत्कार


   वाशीम दि २८ - काश्मिरमध्ये आतंकवाद्यांशी लढतांना दोन आतंकवाद्यांचा खात्मा करणारे केंद्रीय आरक्षित पोलीस दलाचे जवान निशांत अरूणराव काकडे (CRPF Jawan Nishant Arunrao Kakade) यांच्या शौर्याचा सन्मान करीत त्यांना नुकतेच राष्ट्रपती विरता पदकाने सन्मानित करण्यात आले. सदर गौरव प्राप्त करणारे (CRPF Jawan) सिआरपीएफ जवान काकडे हे जिल्हयाचे एकमेव जवान ठरले आहेत. त्यांच्या शौर्याची दखल घेत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी त्यांच्या कार्यालयात मंगळवार 27 जुलै रोजी सत्कार केला.

    यावेळी तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, हभप नामदेवराव काकडे महाराज, भारतीय जैन संघटनेचे शिखरचंद बागरेचा, सामाजिक कार्यकर्ते संजीव भांदुर्गे, विष्णु इंगळे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी निशांत काकडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. देशसेवेसाठी आपण जीवाची पर्वा न करता जे शौर्य दाखविले त्याचे कौतुक करीत भविष्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वाशीम जिल्हयाकरीता ही अभिमानाची बाब असून लाखो लोकांमध्ये देशसेवा करण्याचा असा प्रसंग कोणाच्या भाग्यात फार कमी मिळतो हे भाग्य काकडे यांना लाभल्याचे सांगत त्यांनी त्या संधीचे सोने केले असे प्रतिपादन केले.  

    जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती विरता पदक प्राप्त निशांत काकडे यांनी आपल्या कश्मिर मिशनची माहिती देत आतापर्यंत जवळपास 20 आतंवादी विरोधी मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती दिली.  

No comments

Powered by Blogger.