Header Ads

एनएसएफडीसी योजनेअंतर्गत स्माईल योजना Smile scheme under NSFDC scheme



कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये अनुसूचित जातीमधील ज्या कुटुंबप्रमुखाचे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निधन झाले त्या कुटुंबासाठी 

एनएसएफडीसी योजनेअंतर्गत स्माईल योजना

Smile Yojana Scheme Under NSFDC

मुंबई, दि. 30 : कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये अनुसूचित जातीमधील ज्या कुटुंबप्रमुखाचे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निधन झाले आहे. अशा कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याकरिता एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘स्माईल योजना’ Smile Yojana Scheme under NSFDC राबविण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अनुसूचित जातीतील 18 ते 60 या वयोगटात असलेल्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबाचे पुर्नवसन करण्यासाठी माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर अर्ज भरावा. या योजनेची अधिक माहिती www.mahatmaphulecorporation.com  या संकेतस्थळावर नोटीस सेक्शन मध्ये मिळेल.

या योजनेला अधिकाधिक कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments

Powered by Blogger.