Vardhapan Din

Vardhapan Din

कोरोना लसीकरण मोहिमेच्या कामात कुचराई नको - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. DM order don't spoil time tightly work for vaccinationकोरोना लसीकरण मोहिमेच्या कामात कुचराई नको - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • मानोरा तालुक्यातील लसीकरणाचा आढावा
  • घरोघरी जावून सर्व्हे, जनजागृती करण्याचे निर्देश
  • लसीकरण मोहिमेत हयगय केल्यास होणार कारवाई

वाशिम, दि. ३१ (जिमाका) : जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ही लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरणाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या कामामध्ये हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिला. मानोरा तालुक्यातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मानोरा पंचायत समिती सभागृहात ३० जुलै रोजी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, प्रभारी तहसीलदार संदेश किर्दक, तालुका आरोग्य अधिकारी सागर जाधव, प्रभारी गट विकास अधिकारी श्री. शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी ललसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने जिल्याज त १८ वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामीण भागात अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत. तसेच लोकांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या ठिकाणी व वेळेत लसीकरण सत्रांचे आयोजन करावे.

ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे. तलाठी, ग्रामसेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जावून अद्याप लस न घेतलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करावा. तसेच या व्यक्तीना कोरोना लसीकरण मोहिमेचे महत्व पटवून देवून त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. यापुढे लसीकरण मोहिमेचा नियमितपणे तालुकानिहाय आढावा घेतला जाणार असून कमी लसीकरण असलेल्या गावांचे तलाठी, ग्रामसेवक व इतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाईल. लसीकरण मोहिमेच्या कामात हयगय केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिला.

मानोरा तालुक्यातील कमी लसीकरण असलेल्या गावांचे तलाठी, ग्रामसेवक यांचा यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी गावनिहाय आढावा घेतला. तसेच येत्या काही दिवसांत लोकांमध्ये जनजागृती करून लसीकरण मोहीम गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.

*****

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells