Header Ads

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वाशीम जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांची वर्णी sanjay kakade maratha mahasangh Washim district president



अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वाशीम जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांची वर्णी

कारंजा (लाड) दि. 03 जुलै :-  अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे यांच्या अधिपत्याखालील संघटनेने विदर्भमध्ये मोडणाऱ्या मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवुन त्यांना न्याय देण्याहेतूने अखिल भारतीय मराठा महासंघ वाशीम जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा मराठा समाजातील सुपरिचित व्यक्तिमत्व संजय काकडे यांची दि. 03 जुलै रोजी नियुक्तीपत्राद्वारे नुकतीच नियुक्ती  केली आहे. 

    मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या उद्धारासाठी,  त्यांच्या समस्या सॊडविण्याचे हेतूने विदर्भात मोडणाऱ्या सकल मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याहेतूने कारंजा तालुक्यातील सर्वसामन्यांच्या समस्यांसाठी झटणारे, एकेकाळी कारंजा नगर परिषदचे अध्यक्ष पद भूषविणारे संजय काकडे यांची सर्वानुमते या संघटनेच्या वाशीम जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदरहू नियुक्तीपत्र अखिल भारतीय मराठा महासंघ, पूणे अध्यक्ष ऍड.  शशिकांत आ. पवार, उपाध्यक्ष आ. नरेंद्र अ. पाटील, विनायक मो. पवार, सरचिटणीस राजेंद्र ना कोंढरे, कोषाध्यक्ष प्रकाश व. देशमुख यांच्या मार्गदनाखाली देण्यात आले आहे.  संजय काकडे यांची  वाशीम जिल्हाध्यक्षपदी निवड सामान्य मराठा समाजाच्या हिताची व संघटनेची मुळे वाशीम जिल्ह्यात घट्ट करून तिला वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी करण्यात आली आहे. 

त्यांच्या या नियुक्तीमुळे संघटनेचे पदाधिकारी, मराठा समाजातील नागरिक तथा कारंजा वासियांद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे.

No comments

Powered by Blogger.