Header Ads

एका वर्षाच्या आतील बालकांसाठी न्यूमोकोकल क्वान्जुगेट वॅक्सिन - Pneumococcal quanjugate vaccine for infants under one year of age

Pneumococcal quanjugate vaccine,  न्यूमोकोकल क्वान्जुगेट वॅक्सिन


एका वर्षाच्या आतील बालकांसाठी न्यूमोकोकल क्वान्जुगेट वॅक्सिन

आजपासून पीसीव्ही लसीकरण शुभारंभ

1200 डोस जिल्ह्याला प्राप्त

वाशिम दि. 12 (जिमाका) - एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल  या जीवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी न्यूमोकोकल क्वांजुगेट वॅक्सिनचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील पात्र बालकांचे पीसीव्ही लसीकरण पालकांनी करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

न्यूमोकोकल आजारामुळे बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकतील किंवा काही बाधित बालकांचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. या आजारामुळे कुटुंबांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडू शकतो. बॅक्टेरियल निमोनिया हे पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. न्यूमोकोकल क्वान्जुगेट वॅक्सिन अर्थात पीसीव्ही ही लस बालकांना होणाऱ्या तीव्र स्वरूपातील न्यूमोनियाचे प्रमुख कारण असलेल्या न्यूमोकोकल निमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्याचे प्रभावी साधन आहे. ही लस विनामूल्य जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे.

आजपासून न्यूमोकोकल क्वान्जुगेट वॅक्सिन अर्थात पीसीव्ही लसीकरणाचा शुभारंभ होत आहे. जिल्ह्याला या लसीचे 1200 डोस प्राप्त झाले आहे. दीड महिन्याच्या बालकाचे, साडे तीन महिन्याच्या बालकाचे आणि नऊ महिन्याचे बालक असताना त्याला वेळापत्रकानुसार पीसीव्हीच्या मात्रा देऊन त्याचे लसीकरण करून घ्यावे. या लसीची एकही मात्रा चूकणार नाही याची खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.    

   पीसीव्ही लस ही अतिशय सुरक्षित आहे. ईतर कोणत्याही लसीप्रमाणे ही लस दिल्यावर बालकाला सौम्य ताप येऊ शकतो किंवा इंजेक्शन टोचलेली जागा लालसर होऊ शकते. जेव्हा बालकांना पीसीव्हीची लस देण्यात येईल त्याचवेळी वेळापत्रकानुसार लागू असलेल्या अन्य लसीदेखील देण्यात याव्यात.

     जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत पीसीव्ही लसीच्या प्रसिद्धीचे साहित्य जसे पोस्टर्स, बॅनर आणि पॉम्प्लेट्स देण्यात आले असून या लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.