Vardhapan Din

Vardhapan Din

सहव्याधी असलेल्या क्षयरुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष द्या - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Pay special attention to the treatment of tuberculosis patients with comorbidities - Collector Shanmugarajan S.सहव्याधी असलेल्या क्षयरुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष द्या - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यातील ज्या क्षयरुग्णांना एचआयव्ही, मधुमेह यासारख्या सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) आहेत, अशा रुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष द्यावे. तसेच क्षयरुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांना इतर आजार होवू नयेत, यासाठी सुद्धा खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २९ जुलै रोजी झालेल्या जिल्हास्तरीय टीबी फोरम, टीबी- कोमॉर्बिडीटी समन्वय समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पंचायत समिती सदस्य गजानन गोटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. व्ही. देशपांडे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. लक्ष्मीकांत राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालायचे डॉ. प्रसाद शिंदे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमचे रवी भिसे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमचे डॉ. पंढारकर, ‘निमा’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद लाहोटी, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश परभणकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक एस. डी. लोनसुने यांच्यासह शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात जास्त क्षयरुग्ण आढळणाऱ्या भागांवर लक्ष केंद्रित करून त्याठिकाणी सातत्याने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांचा शोध घेण्यासाठी एकत्रित सर्वेक्षण मोहीम राबवीत असताना प्रत्येक कुटुंबाला भेट देवून अचूक माहिती संकलित होणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणामध्ये आढळणाऱ्या संशयित व्यक्तींची तातडीने क्षयरोग विषयक चाचणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.

खासगी दवाखान्यामध्ये सुद्धा अशी लक्षणे असलेले रुग्ण आल्यास त्याची माहिती तातडीने शासकीय आरोग्य यंत्रणेला मिळणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने आयएमए व निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी. योग्य उपचाराने क्षयरोग बरा होत असला तरी काही रुग्ण उपचार पूर्ण करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे या रोगातून बरे झालेल्या व्यक्तींच्या मदतीने इतर रुग्णांमध्ये उपचाराविषयी जनजागृती करावी, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सांगितले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, मजुरांची लोकवस्ती, झोपडपट्टी परिसरात नियमितपणे आरोग्य तपासणी मोहीम राबवावी. या परिसरात घरोघरी जावून आरोग्य तपासणी करावी. क्षयरोगाची लक्षणे असलेले रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारासाठी आल्यास त्याची माहिती शासकीय यंत्रणेला होण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच क्षयरोगामधून बरे झालेल्या महिलांची मदत घेवून इतर महिला रुग्णांमध्ये क्षयरोग उपचाराविषयी असलेले गैरसमज दूर करावेत. ग्रामीण भागातील क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या आवश्यक चाचण्यासाठी योग्य नियोजन करावे.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देशपांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. परभणकर यांनी जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या क्षयरुग्ण शोध मोहिमेची माहिती दिली. सहव्याधीविषयक तपासणीमध्ये जिल्ह्यातील ६९१ क्षयरुग्णांपैकी २० जणांना एचआयव्ही, २४ जणांना मधुमेह दिसून आले. तसेच २३ जणांना तंबाखूचे व्यसन होते, त्यापैकी १७ रुग्णांनी समुपदेशनानंतर तंबाखू सोडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची चाचणी पद्धत, क्षयरुग्णांवरील उपचारपद्धती याविषयी त्यांनी माहिती दिली.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells