वाशिम जिल्हात उद्या दिनांक ०२ जुलै २०२१ रोजी कोरोना लसीकरण corona vaccination in washim district tomorrow
उद्या दिनांक ०२ जुलै २०२१ रोजी कोरोना लसीकरण विषयी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशिम आवाहन
वाशिम दि.०१ जुलै २०२१ - जिल्ह्यातील सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे की, उद्या दिनांक ०२ जुलै २०२१ रोजी १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम या ठिकाणी लसीकरण सत्र असेल. सर्व लसीकरण केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करावी. यासाठी आज, १ जुलै रोजी रात्री ठीक ९ वाजता उपरोक्त सर्व केंद्रावरील नोंदणी प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे लसीकरण घेण्यास ऑनलाईन पद्धतीने अपॉईंटमेंट बुक करूनच लसीकरण केंद्रावर जावे. जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व कोविड -१९ नियमांचे उल्लंघन होणार नाही.
ऑफलाईन पद्धतीने फक्त ४५ वर्षावरील व्यक्ती, अपंग व्यक्ती, बेघर यांनाच प्राधान्य राहील तरी नागरिकांनी या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, ही विनंती.
- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशिम
Post a Comment