Header Ads

दि.२२ जुलै रोजी कारंजा-शेलूबाजार दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु राहणार change in route Karanja shelu bajar



दि.२२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कारंजा-शेलूबाजार दरम्यानची वाहतूक  पर्यायी मार्गाने सुरु राहणार

कारंजा-मंगरूळपीर-शेलूबाजार मार्गाने होणार वाहतूक

वाशिम, दि. २१ (जिमाका) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सी वरील कारंजा लाड-तऱ्हाळा-शेलूबाजार या मूळ मार्गावरील वाहतूक २२ जुलै २०२१ रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कारंजा लाड -मंगरूळपीर- शेलूबाजार या मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २१ जुलै रोजी जारी केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सी च्या देखरेखीचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अंतर्गत मौजे तऱ्हाळा येथे करण्यात येणाऱ्या कामामुळे येथील वाहतूक २२ जुलै रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे पत्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यान्वयन इकाई-औरंगाबाद कार्यालयामार्फत देण्यात आले होते. त्यानुसार कारंजा-तऱ्हाळा-शेलूबाजार या मूळ मार्गावरील वाहतूक २२ जुलै रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कारंजा लाड -मंगरूळपीर- शेलूबाजार या मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

No comments

Powered by Blogger.