Header Ads

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने ३० जुलै रोजी ऑनलाईन वेबीनार - Caste Certificate Verification Committee Online webinar



जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने ३० जुलै रोजी ऑनलाईन वेबीनार

Online webinar on 30th July on behalf of Caste Certificate Verification Committee

वाशिम, दि. २६ (www.jantaparishad.com) : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक प्रक्रीयेची माहिती नागरीकांपर्यंत पेाहोचविण्यासाठी ३० जुलै २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम यांच्यावतीने हा ऑनलाईन वेबीनार आयोजित केला आहे. या वेबीनारसाठी मिटिंग आयडी ८८३०४४६०१४९ तसेच पासकोड- UHrRj9 यावर क्लिक करुन हा वेबीनार जॉईन करावा. सदर वेबीनार zoom app झुम ॲपवर होणार आहे. तरी जास्तीत जास्त जणांनी या वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीच्या सदस्या डॉ. छाया कुलाल यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.