शेतकऱ्यांनी न उगवलेल्या बोगस बियाण्यांच्या तक्रारी द्याव्यात - खा. भावनाताई गवळी यांचे आवाहन appeal to farmers by MP Bhavana tai Gawali
शेतकऱ्यांनी न उगवलेल्या बोगस बियाण्यांच्या तक्रारी द्याव्यात
खा. भावनाताई गवळी यांचे आवाहन
वाशीम दि. १७ (जनता परिषद) - कोविड 19 कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकरी पहिलेच अडचणीत आला असतांना यावर्षी बऱ्याच भागामधून पेरणी केलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहेत. कृषी सेवा केंद्राच्या दुकानदारांनी विविध कंपन्याचे बियाणे शेतकऱ्यांना विकत असतांना शेतकऱ्यांनी बियाणे चांगले उगवून पीक चांगले येणार या खात्रीवर बियाणे खरेदी केलीत, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे उगवलेच नसल्यामुळे पहिलेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस सोयाबीनच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर काही ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बियाण्यांची केवळ 10-12 टक्के उगवण क्षमता असल्याचे निदर्शनात आले व त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहले आहे व दुबार पेरणी करण्यासाठी पहिलेच मागील वर्षीच्या अतिवृष्टी व कोरोना संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी पुन्हा खाजगी सावकार, बॅंका, दुकानदार यांच्या कडे पदर पसरावा लागणार आहे व बोगस बियाण्यासाठी खर्च केलेले पैसे परत कधी मिळतील या विषयी शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नाही.
याकरीता शेतकऱ्यांनी कुठल्या कंपनीचे बियाणे खरेदी केले, किती क्षेत्रामध्ये परेणी केलेले बियाणे उगवले नाही. हया सर्व बाबींचा शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तक्रारी जनसंपर्क कार्यालय वाशीम येथे देण्याचे आवाहन खा. भावनाताई गवळी यांनी बोगस बियाणेग्रस्त शेतकऱ्यांना केले आहे.
Post a Comment