३५-कारंजा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी व चमुचे यश - Success of 35-Karanja Assembly Constituency Voter Registration Officer and Team
३५-कारंजा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी व चमुचे यश
अमरावती विभागामध्ये मतदारांचे १००% फोटो असणारी मतदार यादी असणारा पहिला विधानसभा मतदार संघ बनला ३५-कारंजा विधानसभा मतदार संघ
कारंजा (जनता परिषद) दि.०१ - अमरावती महसुल विभागामध्ये ३५-कारंजा विधानसभा मतदार संघ हा छायाचित्र मतदार यादीमध्ये १००% मतदारांचे छायाचित्र असणारा मतदार संघ ठरलेला आहे. ३५-कारंजा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीमध्ये फोटो नसणा-या मतदार संख्या कारंजा तालुका ३३६१, मानोरा तालुका ४४२१ असे एकुण ७७८२ एवढी होती. सदर फोटो नसणा-या मतदारांचे फोटो संकलीत करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे दरम्यान कोरोना कालावधीत मतदारांच्या घरोघरी भेटी घेवुन व मोबाईल व्हॉटसऍप द्वारे १६९३ मतदाराचे फोटो संकलित करण्यात आले. त्याचप्रमाणे १२५४ मतदार हे मय्यत असल्याचे आढळून आले त्यांची माहिती घेऊन मय्यत मतदारांचे नमुना-७ अर्ज भरुन घेऊन वगळयाची कार्यवाही करण्यात आली तसेच ४८३५ मतदारांच्या मतदार यादीमधील पत्यावर वांरवार भेटी दिल्या असता ते त्यांच्या पत्यावर राहत नसल्याचे आढळुन आले तसेच त्यांचा संपर्क सुध्दा होवु शकला नाही. त्यामुळे त्यांचे फोटो संकलित करणे शक्य झाले नाही. याबाबत सदर मतदारांची यादी शासनाच्या www.washim.gov.in संकेतस्थळावर, तहसिल कार्यालय, नगर परिषद कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर तसेच ग्रामीण भागातील क्षेत्रीय स्थरावर प्रसिध्द करण्यात आली तसेच विविध Whatsapp ग्रुपवर, प्रमुख राजकीय पक्षानाही पाठविण्यात आली. सदर यादीवरील काही आक्षेप असल्यास त्याकरीता ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला असता विहीत कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा आक्षेप प्राप्त न झाल्यामुळे त्याबाबत मतदान केद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत स्थळ पंचनामा करुन नमुना-७ अर्ज भरुन ऑनलाईन प्रक्रियेमध्ये वगळण्याची कार्यवाही करण्यात येवुन मतदार यादी अद्यावत करण्यात आली.
३५-कारंजा विधानसभा मतदार संघातील कारंजा तालुक्यामध्ये छायाचित्र नसलेले मतदार संख्या ३३६१ होती. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत फोटो गोळा करण्याकरीता विशेष मोहीम राबविली असता त्यामध्ये पकुण ६२४ मतदाराचे फोटो गोळा करण्यात आले व नमुना-८ अर्ज भरुन ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अद्यावत करण्यात आले तसेच मय्यत मतदार ८८३ य कायम स्वरुपी स्थलांतरीत १८५४ मतदारांचे नमुना-७ अर्ज भरुन उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करुन मतदार यादी अद्यावत करण्यात आली.
३५-कारंजा विधानसभा मतदार संघातील मानोरा तालुक्यामध्ये छायाचित्र नसलेले मतदारसंख्या ४४२१ होती. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत फोटो गोळा करण्याकरीता विशेष मोहीम राबविली असता त्यामध्ये एकुण १०६९ मतदाराचे फोटो गोळा करण्यात आले व नमुना-८ अर्ज भरुन ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अपायत करण्यात आले. तसेच मय्यत मतदार ३७१ व कायम स्वरुपी स्थलांतरीत २९८१ मतदाराचे नमुना-७ अर्ज भरुन उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करुन मतदार यादी अद्यावत करण्यात आली.
३५-कारंजा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीमध्ये एकुण ७७८२ छायाचित्र नसलेले मतदार बाबत श्री. शण्मुगराजन एस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वाशिम, श्री. संदीप महाजन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी यांचे मार्गदर्शनात कोरोना कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवुन श्री.राहुल जाधव उपविभागीय अधिकारी कारंजा तथा मतदार नोंदणी अधिकारी कारंजा तसेच श्री. धीरज मांजरे, तहसिलदार कारंजा तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी व श्रीमती शारदा जाधव तहसिलदार मानोरा तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी श्री. विनोद हरणे, निवडणुक नायब तहसिलदार कारंजा, श्री. संदेश किर्दक,निवडणुक नायब तहसिलदार मानोरा, सर्व नियुक्त पर्यवेक्षक, सर्व नियुक्त मतदान केद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) या सर्वाच्या अथक प्रयत्नाने अमरावती महसुल विभागामध्ये ३५-कारंजा विधानसभा मतदार संघ १००% छायाचित्र असलेली मतदार यादी अद्यावत असणारा प्रथम विधानसभा मतदार संघ असणार आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यामुळे आता मुळ मतदारांच्या नावाने दुस-या मतदाराने बोगस स्वरुपाचे मतदान करणे, प्रदत्त मतदान करणे, दुबार मतदान करणे या सारख्या प्रकारास आळा घालणे शक्य होईल व त्यामुळे निवडणुक प्रक्रिये मध्ये पारदर्शकता येईल. असे मत ३५-कारंजा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी व्यक्त केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Post a Comment