Header Ads

जमिनीतील ओलीची खात्री करून वापसा आल्यानंतर पेरणी करा - कृषि विभागाचे आवाहन Make sure the soil is moist and return before sowing - appeal by Agriculture Department


जमिनीतील ओलीची खात्री करून वापसा आल्यानंतर पेरणी करा
कृषि विभागाचे आवाहन

वाशिम (जिमाका) दि. १४ : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तसेच नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ ते २० जून २०२१ या कालावधीत तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये ६ इंच ओल असल्याची खात्री करून वापसा आल्यानंतर विद्यापीठाने शिफारस केलेल्या खोलीनुसार खात्री करून पेरण्या कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक शंकर तोटावार यांनी केले आहे.

 नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने ९ जून रोजीच्या हवामान अंदाजामध्ये जिल्ह्यात १० जून ते १३ जून या कालावधीत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी १७ जूनपर्यंत पेरणी टाळण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले होते. मात्र, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने १४ जून रोजी दिलेल्या हवामान अंदाजानुसार १४ ते २० जून दरम्यान जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यात वारला (७२.६० मि.मी.), हिवरा लाहे (३५.७ मि.मी.) आणि खेर्डा (५६ मि.मी.) ही तीन महसूल मंडळे वगळता इतर सर्व महसूल मंडळांमध्ये ७५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीत ६ इंच ओल असल्याची खात्री करून वापसा आल्यानंतर कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या खोलीनुसार पेरण्या कराव्यात, असे श्री. तोटावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.