Header Ads

मैत्री ट्रस्ट नवसारी (गुजरात) व देसाई फाऊंडेशन नवसारी (गुजरात) यांचे कारंजा लाड येथे जनहितार्थ कार्य desai foundation navsari and maitree trust navsari gujrat charity work


मैत्री ट्रस्ट नवसारी (गुजरात) व देसाई फाऊंडेशन नवसारी (गुजरात) यांचे कारंजा लाड येथे जनहितार्थ कार्य

  कारंजा प्रशासनास ५ लाख पेक्षा जास्त किंमतीचे इंपोरर्टेड कोरोना टेस्ट किट प्रदान 

कोरोनाच्या कंटाळवाण्या वातावरणात मैत्री ट्रस्ट चमुने उधळली देशभक्ती व प्रेरणादायी गितांची बहार 

कारंजा दि.२७ - गुजरात येथील नवसारी जिल्ह्यातील मैत्री ट्रस्ट व देसाई फाऊंडेशन यांच्या वतीने आज कारंजा प्रशासनास कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ५ लाख रुपये किंमतीचे कोरोना टेस्ट किट प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी एक स्वयंपूर्ण ऑक्रेस्ट्रा असलेल्या मैत्री ट्रस्ट च्या ६ जणांनी कोरोनाच्या या कंटाळवाण्या वातावरणात देशभक्ती व प्रेरणादायी गितांची सुमधूर बहार तेही संपूर्ण वाद्यांसह उधळीत एक प्रेरणादायी असे वातावरणाची निर्मिती केली होती.

 


          यावेळी कारंजा तहसील कार्यालय येथे आयोजीत एका कार्यक्रमात कारंजाचे कर्तव्यदक्ष तहसिलदार श्री धिरजजी मांजरे यांनी मैत्री ट्रस्ट चे अध्यक्ष श्री गौतमजी मेहता यांच्या हस्ते प्रशासनाचे वतीने आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. बढे यांचे प्रमुख उपस्थितीत कोरोना किट चा स्विकार केला. 


काल शनीवार दिनांक २६ जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंचावर कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे व ट्रस्टचे अध्यक्ष गौतम मेहता उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीस साप्ताहिक जनता परिषद चे कार्यकारी संपादक आशिष शर्मा यांनी प्रास्ताविक करीत ट्रस्टचे उदात्त हेतू बाबत कौतूक करीत याबाबत थोडक्यात माहिती सांगितली व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष गौतमजी मेहता यांचा सत्कार जेष्ठ पत्रकार प्रा. शेख सर यांनी केला. तर इतर मान्यवरांचा सत्कार पत्रकार प्रविण साबू, प्रा.सि.पी.शेकुवाले सर, आरिफ पोपटे, पटवारी देवेंद्र मुकुंद व कारंजा न.प. आरोग्य विभागाचे राहुल सावंत यांनी केले. यावेळी कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचा सत्कार गौतमजी मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. 

गुजरात येथील देसाई फाऊंडेशन हे सतत विविध माध्यमांद्वारे महिला व बाल कल्याण तसेच नागरिकांचे सहकार्य साठी मदत करीत असते. कोरोनाच्या काळात यांचे माध्यमाने २० कोटी रुपयांची मदत आता पावेतो करण्यात आलेली आहे. मदतीचा लाभ सरळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी सरळ प्रशासनालाच विविध स्वरुपाची मदत हे करीत असतात. कारंजा येथे पत्रकार आशिष शर्मा यांच्या माध्यमातून प्रशासनाला संपर्क करण्यात आला. यावेळी तहसिलदार श्री धिरजजी मांजरे यांनी कार्यक्रमाची आखणी करुन तशी व्यवस्था करुन देत आरोग्य विभागाचे अधिकार्‍यांनाही पाचारण केले. 


यानंतर पार पडलेल्या या कार्यक्रमात या ट्रस्टचे अन्य सदस्य श्री बोमी जागीरदार, ज्युनीअर बाबला (म्यूजीक डायरेक्टर), अमृत सोलंकी (गायक), हिरेन पटेल (साऊंड इंजिनिअर) व आनंद पटेल (तबला वादक) यांनी कोरानाच्या काळात वातावरणात आलेली मरगळ काढणेसाठी संगितबद्ध असे देशभक्ती व प्रेरणादायी गायन करीत प्रेरक अशा वातावरणाची निर्मिती केली. 


यानंतर गौतमजी मेहता व चमुचे वतीने कोरोनाचे युद्धात लढण्यासाठी कामी येणारे कोरोना टेस्ट किट हे कारंजाचे प्रशासन प्रमुख तहसिलदार धिरजजी मांजरे यांच्या सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी ट्रस्ट चे वतीने देण्यात आलेल्या कोरोना किट साठी तहसिलदार धिरजजी मांजरे यांनी मैत्री ट्रस्ट व देसाई फाऊंडेशन यांचे आभार व्यक्त केले. 



या कार्यक्रमाचे संचलन ट्रस्ट चे अध्यक्ष गौतमजी मेहता यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला पत्रकार बंधू हितेश शर्मा, दिपक पवार, अक्षय लोटे, अंकुश कडु, धनंजय राठोड तसेच महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच नगर परिषदचे कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.