सरकार ग्रुप,कारंजा व श्री गुरुमंदीर संस्थान कारंजा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न blood donation camp karanja
सरकार ग्रुप,कारंजा व श्री गुरुमंदीर संस्थान कारंजा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न
111 रक्तदाते यांनी केले रक्तदान
कारंजा दि. ०६ - कोरोना च्या कठीण काळात संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतांना रक्तदान सर्व श्रेष्ठ दान..!! हे बोध वाक्य घेहून कारंजा येथिल सरकार ग्रुप, कारंजा दत्त यांच्या वतीने रविवार दि ६/६/२०२१ रोजी शिवराज्याभिषेक दिन तसेच स्व.माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतीपित्यार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष म्हणून श्री गुरुमंदीर सस्थान कारंजा चे अध्यक्ष नारायण खेडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार धीरज मांजरे, रा स्व चे जिल्हा सहकार्यवाहक विजय कदम, डॉ अजय कांत, श्री गुरुमंदीर चे व्यस्थापक प्रकाश घुडे, अभय पारसकर, गोलू डहाके, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, नगरसेवक प्रसन्ना पळसकर, नगरसेवक नितीन गडवाले, दै. सकाळचे पत्रकार मनीष भेलांडे, कौस्तुभ डहाके, विशेष जिव्हाळा अकोला चे पवन डाबलकर व सरकार ग्रुप चे अध्यक्ष योगेश उर्फ विक्की पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार धीरज मांजरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र वाचून ते आत्मसात करावे व रक्तदान करून लोकांची सेवा करावी असे आवाहन केले.
रा स्व चे विजय कदम यांनी शिवाजी महाराजांनी जे कार्य केले ते महान कार्य होते. स्व. प्रकाशदादा बद्दल बोलतांना दादा हे दूरदृष्टीकार होते त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची 100 खाटाची इमारत बांधून एक उपहारच आपल्याला दिला आहे. कारण कोरोनाच्या काळात ती कारंजा साठी संजिवनीच ठरली आहे, असे मत व्यक्त केले.
डॉ अजय कांत यांनी दादा हे सर्वसांमान्याचे नेते होते. कोणालाही सरळ मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता असे त्यांनी सांगितले.
शिबीराला भेट देण्यासाठी माजी गृहमंत्री श्री डॉ रणजितजी पाटील, सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ पंकज काटोले, अविनाश खेडकर, आशिष तांबोलकर, निलेश घुडे, अतुल बर्डे, दै. मातृभूमी चे समीर देशपांडे नगरसेवक अमोल गढवाले, कुणाल महाजन, अतुल दरेकर, राहुल देशमुख यांनी रक्तदान शिबिराला भेट देवून रक्तदान करणाऱ्यांचे मनोबल वाढवले आणि आपण ही रक्तदान करून राज्यातील गंभीर रुग्णांना मदतीचा हात देत आहात. लसीकरणामुळे रक्ताचा तुटवडा अधिक जाणवत असल्यामुळे. आपण रक्तदान करून आपला मदतीचा हात नक्कीच गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल असे सांगितले. त्यावेळी विषय सहकार्य अकोला ब्लड बँक अकोला, जिव्हाळा ग्रुप अकोला, रक्तदाते व श्री गुरुमंदीर रुग्णवाहिका कारंजा याचे लाभले.
त्यावेळी सरकार ग्रुप चे स्वप्नील शिंदे, यश पल्वेवार, भारत तोडकर, अजिक्य तीलगाम, प्रणय करडे, अनुराग बारबोले, आदेश राऊत, राज डहाके, शाहू डहाके, सत्यजित डहाके, फुलकीत सूर्यवंशी, प्रफुल्ल चिनके, आशिष ठाकरे, संदेश राऊत, प्रणय काळे, विरंग पुरी, संकेत चोधरी, आदित्य बलखंडे, शिवम चोधरी, सौरभ डाखोरे, अनुराग खानजोडे, प्रमेश खानजोडे, आकाश ढाकुलकार, निकील लाहे, सचिन ठाकूर, सुमित तिडके, प्रफुल्ल महाजन, यश होणराव, वैभव जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम चे संचलन हे अजिक्य जवळेकर व आभार रमेश देशमुख यांनी व्यक्त केले.
Post a Comment