Header Ads

कारंजा दि १६ में २०२१ - उपजिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा परिसरात जमावबंदी आदेश - Restrictions at SDH karanja

 उपजिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा परिसरात जमावबंदी आदेश : कलम १४४ लागु 

कारंजा (जनता परिषद) दि.१६ - उपजिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा येथे कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूचे गंभीर / अतिगंभीर रुग्ण उपचाराकरीता भरती असून येथे रुग्णांचे नातेवाईक खुप जास्त प्रमाणात गर्दी करतांना आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार करणे व संसर्गजन्य आजाराचा / रोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा परिसरात जमावबंदीचे आदेश कारंजाचे तालुका दंडाधिकारी तहसिलदार धिरज मांजरे यांच्या विनंतीवरुन उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी दिले आहे. 

फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये हे आदेश लागू करण्यात आलले आहे. तरी या परिसरात रुग्णांचे व्यतिरिक्त रुग्णांचे नातेवाईक व इतर व्यक्तींनी गर्दी करुन जमाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी जनहितार्थ या आदेशाचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राहुल जाधव व तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 

या आदेशाचा भंग करणार्‍या व्यक्ती, संस्था अथवा समुहाने फौजदार दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, १९६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र अपराध केला आहे असे मानून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. 

No comments

Powered by Blogger.