Header Ads

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नूतन आदेश - लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन ची आवश्यकता नाही - Registration not required for vaccination


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नूतन आदेश 
लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन ची आवश्यकता नाही 
थेट लसीकरण केन्द्रावर होणार नोंदणी 

    नवी दिल्ली दि २४ - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांना व्हॅक्सिनबाबतच्या नियमात बदल केला आहे. या नवीन नियमानुसार नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर डोस घेता येणार आहे.आता पावतो 45 वर्षांवरील लोकांना नोंदणी न करता लसीकरण केले जात आहे तर 18 ते 44 वर्षांच्या लोकांसाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे बंधनकारक होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यात बदल केला आहे. त्यांचे नोंदणी ही लसीकरण केन्द्रावरच केली जाणार आहे. 

    मात्र ही सुविधा फ़क्त शाश्कीय लसीकरण केन्द्रावरच उपलब्ध राहणार आहे. तसेच लसीकरण केन्द्रावरच याची नोंदणी देखील होणार असून या बाबतचा निर्णय राज्य शासन घेईल, असेही सांगण्यात आले आहे.  

या निर्णयासाठी दोन कारण सांगितले जात आहेत 

१) लसकरणासाठी स्लॉट बुक करुनही, बरेच लोक लसीकरण केंद्रावर पोहोचत नसल्यामुळे, लस खराब झाल्याचे वृत्त येत होते. तसेच 

   २) ग्रामीण स्तरावर ऑनलाईन बुकिंगची माहिती नसल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. 

यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.  

No comments

Powered by Blogger.