Header Ads

कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांचे दु:खद निधन - Prakashdada Dahake passed away


 कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांचे दु:खद  निधन 

कारंजा (जनता परिषद) दि.१० - कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाशदादा डहाके यांचे आज दि. १० मे २०२१ रोजी नागपूर येथे उपचारा दरम्यान ११.४५ ला दु:खद निधन झाले. 

त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, ३ भाऊ, २ बहिनी व बराच मोठा आप्त परिवार आहे. राज्याचे गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील हे त्यांचे बहिण जावाई आहे. 

दादा म्हणजेच मोठा भाऊ च्या रुपात सदैव पाठीशी उभा राहणारा, एक लढवय्या नेता, संघर्षशील नेतृत्व, वाशिम जिल्ह्याचे सामाजीक व राजकीय नेतृत्व करणारे उत्तुंग व्यक्तीमत्व ते होते. दादाच्या जाण्याने समस्त कारंजात शोककळा पसरली असून आपल्याच घरातील एक व्यक्ती गेला अशी भावना प्रत्येक कारंजेकर व्यक्त करीत आहे. एक हक्काचा माणूस, कारंजा शहराची शान, कारंजाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगणारा एक भूमीपुत्र हरविला असे मत आज प्रत्येक जण व्यक्त करीत आहे. 

No comments

Powered by Blogger.