Header Ads

माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानंतर परिवाराचे जनतेला भावनीक जाहीर आवाहन - appeal by family in public interest

माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानंतर परिवाराचे जनतेला भावनीक जाहीर आवाहन

कारंजा (जनता परिषद) दि.१० - माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानंतर  त्यांचे परिवाराने समस्त जनतेला भावनीक आवाहन केले आहे. 

" आमचे वडिल व आपले सर्वाचे लाडके प्रकाश दादा डहाके यांचं दुःखद निधन झालेलेआहे . आपण सर्व आमच्या दुःखामध्ये सहभागी आहे याची जाणीव आम्हाला आहे. सर्वांना नम्र विनंती आहे कि, कोणीही आमच्या राहत्या घरी अथवा स्मशान भूमी मध्ये येऊन अंत्यविधीसाठी गर्दी करू नये. आपण आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने आपल्या घरूनच आपणाला अंत्य दर्शनाची व अंत्यविधीची सोय आम्ही फेसबुक वर यूट्यूब चैनल वर करत आहोत . त्याची लिंक थोड्याच वेळामध्ये आम्ही आपल्याला पाठवू .त्यामुळे कोणीही खेडेगावातून तसेच शहरांमधून घराकडे येऊन गर्दी करु नये ही विनंती. -आपला कौस्तुभ प्रकाश डहाके"

No comments

Powered by Blogger.