Header Ads

वाशिम दि.२० - वाशिम जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा krushi sewa Kendra timings

Krushi seva kendra

वाशिम जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

वाशिम, दि. २० (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २० मे रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. 

जिल्ह्यात सर्व किरण दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, पिठाची गिरणी व रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, पिठाची गिरणी व रेशन दुकाने यांना ग्राहकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यास मुभा राहील, असे आदेश नमूद करण्यात आले आहे. २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे आदेश जिल्ह्यात लागू राहणार आहेत.

*****

No comments

Powered by Blogger.