Header Ads

वाशिम, दि. ३० - जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय कायम - The decision of institutional quarantine in washim district remains


dr madhukar rathod cs washim

वाशिम जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय कायम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांचे स्पष्टीकरण

वाशिम, दि. ३० (जिमाका) : कोरोना बाधितांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदर माहितीला दुजोरा दिल्याचा दावा करण्यात आला असून सदर दावा चुकीचा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय कायम असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात गाव पातळीवर विलगीकरण कक्ष स्थापन करून कोरोना बाधितांचे संस्थांत्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गाव पातळीवर विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. असे असतांना काही प्रसारमाध्यमांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असून यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदर माहितीला दुजोरा दिल्याचे म्हटले आहे, मात्र आपण अशी कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

No comments

Powered by Blogger.