Header Ads

ग्राहकांना बँक खात्यातील रक्कम मिळणार घरपोच ! Customers will get bank account money at home !

Postman, Post office India
ग्राहकांना बँक खात्यातील रक्कम मिळणार घरपोच !

Customers will get bank account money at home!

  • भारतीय डाक विभागामार्फत सुविधा
  • बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी होणार मदत

वाशिम, दि. १७ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या काळात वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्यातील १० हजार रुपयेपर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभाग (Post Department) मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेवून बँकेत होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.

संचारबंदी काळात डाक विभागामार्फत जनतेला बचत बँक सुविधा, टपाल वाटप, रजिस्टर बुकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग या सुविधांसोबतच राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपयेपर्यंत रक्कम काढून पोस्टमन (Postman) मार्फत अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व आवश्यक असलेल्या रक्कमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जावून बँक खात्यातून रक्कम काढून अदा करण्याची कार्यवाही करेल, असे डाक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोस्टाच्या अनसिंग- (०७२५२) २२६३६५, आसेगाव – (०७२५३) २६५५११, कामरगाव – (०७२५६) २३५०१५, कारंजा- (०७२५६) २२५६८६, गुरुमंदिर जवळ कारंजा- (०७२५६) २२२३१०, मालेगाव- (०७२५४) २७१२४३, मंगरूळपीर- (०७२५३) २६१०८०, मानोरा- (०७२५३) २६३०२२, रिसोड- (०७२५१) २२३६६५, रिठद – (७२५१) २२५०६०, शेलूबाजार- (०७२५३) २३४२०४, शिरपूर – (०७२५४-२३४४८४), वाशिम – (०७२५२) २३३४९६, वाशिम शहर – (०७२५२) २३१२१३ यापैकी आपल्या नजीकच्या उप कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना आपली मागणी नोंदविता येईल. तसेच यामध्ये काही अडचण आल्यास अकोला डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयातील ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे.

Washim District all Post office Phone Numbers - Ansing- (07252) 226365, Asegaon- (07253) 265511, Kamargaon- (07256) 235015, Karanja- (07256) 225686, Karanja near Gurumandir- (07256) 222310, 2723, Mangal , Manora- (07253) 263022, Risod- (07251) 223665, Rithad- (7251) 225060, Shelubazar- (07253) 234204, Shirpur- (07254-2344484), Washim- (07252) 231213

No comments

Powered by Blogger.