Vardhapan Din

Vardhapan Din

दि १९ में २०२१ - वाशिम जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र राहणार बंद शुद्धिपत्रक द्वारे सुधारित आदेश निर्गमित - aple sarkar seva kendra will remain closed till next order


बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
शुद्धिपत्रक द्वारे सुधारित आदेश निर्गमित 
वाशिम जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र पूर्णत: राहणार बंद

वाशिम, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या आदेशात अंशतः बदल करून १७ मे रोजी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले होते. या आदेशात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बँकेच्या कामासाठी सुरु राहतील, असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याबाबतचे शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून आपले सरकार सेवा केंद्राऐवजी जिल्ह्यातील बँक व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र पूर्णतः बंद राहणार आहेत. याबाबतचे शुद्धिपत्रक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १८ मे रोजी निर्गमित केले आहे. 

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells