वाशिम, दि. १५ - पोहरादेवी येथील यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद - Yatra at Pohardevi canceled

पोहरादेवी येथील यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद
१८ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान पोहरादेवी, उमरी खुर्द परिसरात मानवी हालचालीस प्रतिबंध

वाशिम, दि. १५ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान येथे राम नवमी अर्थात २१ एप्रिल २०२१ रोजी होणारी यात्रा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये रद्द करण्याचे आदेश १२ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच आता १८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत श्री संत सेवालाल महाराज संस्थान, पोहरादेवी व उमरी खुर्द (ता. मानोरा) केंद्रस्थानी ठेवून चारही दिशांना ५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरात मानवी हालचालींना पूर्णतः प्रतिबंध घालून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १४ एप्रिल रोजी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार बाहेर जिल्ह्यातून पोहरादेवी व उमरी खुर्द येथे यात्रेच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भाविकांसाठी सीमाबंदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी संबंधित महंत, महाराज व संबंधित ट्रस्ट यांनी यात्रा रद्द असल्याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...