Header Ads

वाशिम दि. २९ - लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना मिळणार टोकन vaccination by token system

 


लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना मिळणार टोकन

वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविड -१९ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग व व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी एका आदेशाद्वारे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांना लसीकरणासाठी टोकन प्रणाली वाटपाची कार्यपद्धती व जबाबदारीचे एकत्रितपणे नियोजन करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

No comments

Powered by Blogger.