Vardhapan Din

Vardhapan Din

वाशिम दि.२९ - रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा अवैध साठा केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Strict action against illlegal storage of remdisiver inj and oxygen

रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा अवैध साठा केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात कोणीही रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा अवैध साठा किंवा चढ्या दराने विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हास्तरावर नियुक्त समन्वय कक्षाच्या माध्यमातून दैनंदिन ऑक्सिजनची मागणी नोंदविणे व या मागणीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे काम केले जात आहे. तसेच गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे.

सद्यस्थितीत मागणी वाढली असल्याने ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवैध साठा करून त्याची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अशाप्रकारे कोणीही ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवैध साठा करून ठेवल्याचे किंवा त्याची चढ्या दराने विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अधिकृत वितरकांशिवाय कोणीही ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आल्या आहेत. असे प्रकार घडत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी ८३७९९२९४१५ या क्रमांकावर व्हाटसअप संदेश करून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells