Header Ads

दि १४ एप्रिल २०२१ - आज कारंजा शहरात २ तर तर ग्रामीण भागात खालील ठिकाणी लसीकरण होणार - vaccination at following centers in karanja today


आज १४ एप्रिल रोजी कारंजा शहरात २ तर ग्रामीण भागात खालील ठिकाणी लसीकरण होणार
नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांचे आवाहन 

कारंजा (प्रति.) दि.१४ - कोरोना पासून बचाव होणेसाठीचे कोरोना लसीकरण मोहिम शासनाकडून मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे या हेतूने प्रशासनाने अनेक जागांवर (केंद्रांवर) लसीकरण सुरु केले आहे. या अंतर्गत आज १४ एप्रिल रोजी कारंजा शहरात २  तर कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी खालील जागांवर लसीकरण होणार आहे. 

तरी पात्र व्यक्तींनी ह्या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहनं तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे.  

ही केंद्र पुढील प्रमाणे आहेत. 

कारंजा शहर - १. उपजिल्हा रुग्णालय, कारंजा २) मुलजी जेठा हायस्कुल कारंजा 

कारंजा ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र - ढंगारखेड़ा,  धोत्रा,  बाम्बरडा,  धनज बू,  पोहा,  लोहारा, भडशिवनी, सोहळ, धामणी, कामरगाव 

या गावातील सर्व ग्रामसेवक, पोलिस पाटिल, कोतवाल, तलाठी, कृषि सहायक, आशा वर्कर, आंगनवाड़ी सेविका, शिक्षक यांनी गावात हजर राहून जनजागृति करावी व जास्तीत जास्त लसीकरण होईल या करीता प्रयत्न करावे असे निर्देश देण्यात आले आहे.  

No comments

Powered by Blogger.