Header Ads

वाशिम दि २८ - आपत्ती व्यवस्थापन व धोके, जनजागृती विषयावर ३० एप्रिल रोजी ऑनलाईन वेबीनार - online webinar on disaster management

आपत्ती व्यवस्थापन व धोके, जनजागृती विषयावर ३० एप्रिल रोजी ऑनलाईन वेबीनार

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत करणार  मार्गदर्शन 

वाशिम, दि. २८ (जिमाका) : जिल्हयातील युवक-युवतींसाठी येत्या ३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता दरम्यान जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या वतीने कोरोना महामारी या साथीच्या रोगावर उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व धोके, जनजागृती या विषयावर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

या ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभाग घेवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना https://meet.google.com/sdj-dqby-uvd या लिंकवर क्लिक करुन या सत्रास जॉईन करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इंस्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉईनवर क्लिक करावे. सदर सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी १० मिनिट वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडीओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक अनम्युट सुरु करुन विचारावे व लगेच माईक म्युट करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारतांना मोजक्या शब्दात विचारावे. काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनीवर तसेच ९६६५५२५६५१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हयातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी मोफत ऑनलाईन वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.