Header Ads

दि १२ एप्रिल २०२१ - पुज्य सिंधी पंजायत, कारंजा चे वतीने १३ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन - blood donation camp by pujya sindhi panchayat karanja


पुज्य सिंधी पंजायत, कारंजा चे वतीने १३ एप्रिल रोजी 

भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

कारंजा दि. १२ - कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्या अनुषंगाने शासनचे वतीनेही रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली जबाबदारी म्हणून व समाजाचे प्रती कर्तव्य म्हणून समाजाकार्यात नेहमीच अग्रसर असणार्‍या कारंजा पुज्य सिंधी पंचायत चे वतीने मंगळवार दिनांक १३ एप्रील रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदरहू रक्तदान शिबीर हे उद्या मंगळवार दिनांक १३ एप्रील रोजी श्री झुलेलाल भवन, सिंधी कॅम्प कारंजा येथे संध्याकाळी ४ ते ८ या वेळे दरम्यान होणार आहे. यावेळी कोरोना पासून बचाव करणेसाठीच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. 

तरी या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी रक्तदान करुन समाजकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत विजय जेसवाणी (९४२३६५१७१९) किंवा नितीन नागवाणी (८३८००२३६८९) यांचेशी संपर्क साधावा. 

No comments

Powered by Blogger.