Header Ads

दि.०४-०३-२०२१ वाशिम : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदाऱ्यांची विभागणी - Division of responsibilities for effective implementation of corona preventive measures

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदाऱ्यांची विभागणी

शहरी तसेच ग्रामीण भागातील फेरीवाले व विक्रेते तसेच गृह अलगीकरणातील व्यक्ति बाबत जबाबदारी निश्चित 

वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे आदेश जारी 

वाशिम, दि. ०४ : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी यंत्रणानिहाय जबाबदारीची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी आपल्यावर सोपविलेल्या बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार शहरी भागातील फेरीवाले, विक्रेते यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक प्राप्त करून आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करून घेण्याची जबाबदारी नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील फेरीवाले, विक्रेते यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक प्राप्त करून आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करून घेण्याची जबाबदारी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गृह अलगीकरणाचे (होम क्वारंटाईन) निकष पूर्ण करीत असलेल्या कोरोना बाधितांना होम क्वारंटाईनची परवानगी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झाल्यानंतर त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्याची जबाबदारी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर राहणार आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात संबंधित मुख्याधिकारी यांनी एक पथक तयार करावे. तसेच ज्या व्यक्ती होम क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून जास्त जोखमीचे संपर्क, बाधित रुग्ण यांच्या विलगीकरणावर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या ३ मार्च २०२१ रोजीच्या आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीकडून अंमलबजावणीसाठी उपाययोजना करून घेण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.